रात्री झोप लागली नसताना
बद्लणारया कुशीसारखं असतं
कधी सुखाकडे बघत
सुंदर स्वप्न रमवत असतं
तर कधी दुःखाकडे पाहून
निराश होत असतं
जीवनात अनेक प्रश्न उद्भवतात
पण प्रत्येकाचं उत्तर मिळतच अस नाही
पण ह्या वाटेवरून चालताना
एक एक कोड उलगडत जातं
जीवनातली नाती
मनाला दिलासा देतात
पण शेवटी , पण शेवटी
व्हायच तेच होत
कारण जीवन जगणारा प्रत्येक माणुस
हा त्या जीवनाचा प्रतिस्पर्धी असतो
अगदी जन्मापासुनच तो
त्याच्याशी लढत असतो
पण ह्या खेळात विजय मात्र
जीवनाचाच होतो
कारण माणसाचा मृत्यु हा
खेल संपवायला कारणीभूत ठरतो
बद्लणारया कुशीसारखं असतं
कधी सुखाकडे बघत
सुंदर स्वप्न रमवत असतं
तर कधी दुःखाकडे पाहून
निराश होत असतं
जीवनात अनेक प्रश्न उद्भवतात
पण प्रत्येकाचं उत्तर मिळतच अस नाही
पण ह्या वाटेवरून चालताना
एक एक कोड उलगडत जातं
जीवनातली नाती
मनाला दिलासा देतात
पण शेवटी , पण शेवटी
व्हायच तेच होत
कारण जीवन जगणारा प्रत्येक माणुस
हा त्या जीवनाचा प्रतिस्पर्धी असतो
अगदी जन्मापासुनच तो
त्याच्याशी लढत असतो
पण ह्या खेळात विजय मात्र
जीवनाचाच होतो
कारण माणसाचा मृत्यु हा
खेल संपवायला कारणीभूत ठरतो