Monday, January 31, 2011

आणि आज ती माझ्या घरी आली
घरभर रुणझुणली..सगळ्यांशी चिवचिवली
तिची भिरभिर नजर माझं आभाळ देखील स्पर्शून आली
आणि मग थोडीशी हिरमुसली.......
लूकलूकती सगळ्यांकडे पाहून
शेवटी माझ्याच कुशीत येऊन विसावली

Thursday, January 13, 2011

छानी माझी सोनुकली ती
कुणाकडे गं पाहत होती
कोण बरे त्या संध्येतुन
हळूच पाहते डोकावून
तो रविकर का गोजिरवाणा
आवडला आमुच्या राणीला
लाजलाजली ह्या वचानानी
साधी भोळी ती फुलराणी