Friday, August 20, 2010

Yuva

उस सोच को बदल के सोच जरा
इस सोच की वजह सोच जरा
उस राह का अंत देख जरा
इस राह की मंजिल देख जरा
वो कांच की दुनिया छोड़ जरा
ये काँटों भरी सांझ देख जरा

वहाँ तेरा कोई अपना है, मिट्टी भी नहीं ,
सब कुछ छू मन्तर एक सपना है
यहाँ का आसमाँ तक तेरा है,
हर आँख का तू ही सपना है
दिशा ढूंढता एक बहाव बन
टस से मस होने वाला पहाड़ भी ना बन
ठेहराव और बहाव को संग बांधता
तू नया युवा बन
तू नया युवा बन ..
मी : कसा वाटतो गं तुला पाऊस
छान भिजावसं वाटत का?
टपोरेसे पहिलेवाहिले सारे थेंब
ओंजळित भरून घ्यावेसे वाटतात का?

ती : पहिला पाऊस ??
ब्यादचं वाटते ती
कितीही तयारी असली
तरी पाणी घरात शिरतचं
ठिगळ लावुन जोडलेलं ते घर
वरुणराजासमोर कधीच टिकत नाही
मग नुसती धावपळ
आसरयासाठी........
नुसती वाट
पाऊस संपण्याची......
मग कशी मी आंगणात बसून
बघू तो पाऊस
म्हणु आईला मला भिजयाचय.....
मलाही त्या पावसात होड्या सोडायच्यात
तुम्ही आसुसता त्या पावसात भिजण्यासाठी
आणि आमची तळमळ त्याच्यापासून दूर रहण्यासाठी..
माझ्या पाखरा माझ्या सख्या
तुझ्याविण न दिन न रात्र माझी
रविभेटीसाठी परिक्रमे ती धरती
पण फाटकी ही झोळी माझी.....

तुझ्यासवे अशी ही जगते रे मी
तुझ्यासंग जग हे पाहते रे मी
कवडश्यातुन आत येणारया त्या किरणातही
तुलाच शोधते रे मी...

पुसत नाही छबी मिटल्या पापण्याही
राही गुंजत शब्द तुझे माझ्या तनमनी
नज़र शोधते तुला ह्या जगात आणि
मन राहतं तुझ्याबरोबर त्या जगात ...
आठवणींनी भरलेल्या माझ्या मनाला
फक्त तुझी साद ऐकू येते
नयनी भरलेल्या आसवांना
फक्त तुझं येणं भुलवतं
आसुसलेल्या माझ्या ओठांना
फक्त तुझाच स्पर्श समज़तो
तू जेव्हा माझा हात हातात धरशील
तेव्हा असंच काहीतरी बोलशील ना?

चांदण्यांनी माखलेल्या अंगणात
झुले उंच उंच जातील
आयुष्याच्या वाळूवर मी लिहिन
अन तू कड़ा बनुन लाटांना थोपवशील
तुझ्या अस्तित्वाचे होणारे भास
सत्यात आता उतरतील
तू जेव्हा मला भेटशील
तेव्हा असंच काहीतरी होईल ना?

का वाटतयं आज तू जवळ असावास
तुझ्या मिठीमध्ये माझा श्वास गुदमरावा
माझ्या केसात फिरणारा तुझा हात
मी पुन्हा पुन्हा चुम्बावा
आणि माझं भालचुम्बन घेऊन तू मला थोपठावं
सुखाची नजर उतरवणारे काजळी थेंब
शिंपल्यात धरायलाही तूच येशील ना ?

Charolya

माझं म्हणून जपलेलं
आज चिमटीतुन वाहून गेलं
न्हाऊ माखु घातलेलं
पिल्लू घरट्यातुन उडून गेलं ....

*************************************************************************************

प्रत्येकाने नविन वाटा कुठून शोधायच्या
काही अपूर्ण जुन्या वाटा कुणी पूर्ण करायच्या?

*************************************************************************************

तप्त उन्हातील खोटी दर्पणे
खोट्या आशा अन खोटीच मापने
खोट्या ह्या जगात वावारणारी
दोनच खरी माणसे .....

*************************************************************************************

कुणाच्याही येण्याजाण्याने
फरक पडण्यासारखं
आता काही राहिलं नाही
तू निघून गेलास तेव्हापासुन
जीवनामध्ये जगण्यासारखं
काही उरलं नाही......

*************************************************************************************

येतानाही आपण ऐकटे
आणि जातानाही आपण ऐकटे
एवढाच हिशोब का मांडावा
त्या दोहोंमध्ये जगलेला काळ
इतक्या लवकर का विसरावा ??

*************************************************************************************

आप अपने आसुओंसे
अपने दुःख को सेहलाते हो
आप अपने गम को
बातों में सजा लेते हो
सबको बता देते हो.....
पर क्या करे
हम तो नाही बोल सकते हैं
नाही आपके सामने रो सकते हैं............

*************************************************************************************

आगे बढ़ते हुए कठिण राहों मैं
पीछे मुड़ना ही जिंदगी नहीं
बहाव के सांग बहनेवलोसंग
हमारी कोई तुलना नहीं ........

*************************************************************************************

आपण पुढे जाताना
मी मागे राहिल्याचे
तुला कळलेच नाही
नुसता डोळ्यांनी पण
समजावता येतं म्हणे
पण मी... पण मी तर
बोलुनही दाखविले
तू आता तो राहिला नाहीस
का तुझ्या मनातिल ती
आता मी राहिले नाही???

*************************************************************************************


प्रेमाच्या शेवटी तो सोडून गेला
शेवटची आठवण म्हणुन कविताच घेउन गेला 

*************************************************************************************

सूरज की वो राह सुहानी
क्युँ मेरा घर हैं छुटा
नाही पर्वत ना बादल कोई
क्युँ मेरे यहाँ अँधियारा सा टुटा?
राह चलत जो राह भूल जाये
क्यों ऐसी काली गली हैं मेरी
चांदनी भरी हर घर घर मैं
फिर भी क्युँ बद्ननाम गली हैं मेरी ?
धुप ना लागे छाँव भी ना रहे
अधमरी सी ज़िन्दगी हैं भागे
जाने किस रूप आओगे तुम
रोशन होने को मेरा भी मन तरसे....

Friday, August 6, 2010

आभाळाने रडण्यासारखं
इतकही आपल दुःखं मोठं नाही
झालचं तर एवढचं
काही चुकार थेंब तुज्यामाज्यामध्ये सांडलेले...

Thursday, August 5, 2010

माझ्या नभातल्या तारकांनो
काय गुन्हा माझा झाला
संपले तेज सारे अन
संपला साथ आपुला....

आठविती मज चांदराती
अवखळसे रूप ते
लखलखाटी हास्य आणि
नयनी भोगलेली आसवे....


साथ आपुला दूर पळवे
शिणवट्याची सारी क्षणे
गुलाबी ह्या स्वप्नामधला
काटा कोणता आता रुते...


सत्य मज़ कुणी दाखवावे
सांगावे अन समज़वावे
सत्य मानु काळोख़ हा का
तारकांची ती अंगणे.....


चांदण्याचे दुःख मला
काळोख़ाचा डर मला
रवितेज जपणारया माझ्या नभाला
तारकांची आता तमा....