Friday, July 30, 2010

सरसरणारया माझ्या पाखरा
चिंब मनातील माझ्या घना
बरसून ये ह्या धरणीवरती
दाखविण्या माझ्या प्रेमा...



प्राजक्ताचा सडा माझ्या अंगणी
सहस्त्रावधि विखुरलेलेया चांदण्या
त्या केशरी देठा जपण्या
हळूच गोंजार ना माझ्या फुला....




तुकतुकणारया त्या दवाबिंदुना
तुझ्या माझ्या भेटी सांग ना
मातीत मिसळुन त्यांना
नव अंकुर फुटू दे ना ......






हर तुटते हुए तारेसे
आपसे मिलानेकी गुज़ारिश की है
झुके हुए सर से सिर्फ
आपको पाने की ख्वाईश की है...........
जीने दो मुझे भी
दुनियांकी रसमों
कुछ और नहिं बस
मोह्हबत ही तो की है.........

काय कराव असं आपण
की परत प्रेमात पड़ता येईल
माझ्य नज़रेमध्ये तुझं
आख्खं विश्व सामावून जाईल ...

फिरायच का त्या भन्नाट वारयात
घरच्यांपासुन लपवून
भिजयाच का त्या टेकडीमागच्या धरणात
पावसाचं कारण देऊन .......

का मारायच्या त्या सततच्या गप्पा
सानुली आपली दुनिया रमवत
दारापुढे एक सुन्दर तुळशी वृंदावन
ह्यावर आपलं झालेलं एकमत...

तू
गजरा आणालास
तर आजही माळीन मी तो
केस थोड़े लहान आहेत
पण त्यासाठी नक्की वाढविन...

मित्रांच्या गराड्यात उभ्या माझ्या प्रेमाचा रुबाब
एक चोरटी नज़र हळूच शोधते
पण स्वतःतच दंग तुझा प्रतिसाद आल्याने
ती पुर्णपणे कोमेजते...

नेसू का ती साड़ी तू हौसेने आणलेली
आज शोभणार नाही कदाचित तुझ्या प्रतिष्ठेला
पण कदाचित थोडा वेळ..थोडा वेळ तरी
तुजी नज़र माझ्यावर विसवशिल ....

काय कराव अस आपण
की तू अचानक लवकर घरी येशील
हातात धरून हात माझा
तुझं नवं कौतुक मला सांगशील....



Thursday, July 29, 2010

आठवण तुझी आली की
नविन एक कविता तयार होते ...
मी प्रत्यक्षात जेवढं तुला ऐकतो
त्याच्या दुप्पट तू ह्या कवितेत बोलतेस...

तुझं सगळचं निराळं
तुझं हसणं , तुझं बोलणं , तुझं चालणं....
सगळ्यात उठुन दिसणारं
किंवा कदाचित मला तरी तसं वाटणारं .....

Wednesday, July 28, 2010

मैं सत्य हूँ
अटल हूँ
तपता हुआँ सूरज हूँ
शांत कोमल छाव हूँ
मैं कुछ तुझं जैसा हूँ
तू कुछ मुझं जैसा हैं
फिर भी तू मेरी परछाई हैं
तू आभास है
पर मैं सत्य हूँ
अटल हूँ........


तू हो म्हणाल्यापासुन
आभाळ मला ठेंगणं झालयं.....
फक्त तुझा हात हातात धरयाचाय
म्हणून जमिनीवर परत येण झालयं....

Tuesday, July 27, 2010

जो कलम से उतरी है वही मेरी सच्चाई है
चेहरे पर जाने कबसे नकाब की परछाई है

Monday, July 19, 2010




पावसाच्या रिमझिम सरिसारखं
त्या उगवत्या बिबांच्या लालीसारखं
मी शोधते
कुणीतरी तुझ्यासारखं......



अफाट वारयात मस्ती करणारया तृणासारखं
त्या तृणांवर चमचमणारया चांदीसारखं
मी शोधते
कुणीतरी तुझ्यासारखं......




माझ्यापासुन निघालेल्या सर्व वाटा तुज्याचपाशी येउन थांबतात
आणि तुझ्यापासुन निघालेल्या ,
त्याही शोधतात का ?
कुणीतरी माझ्यासारखं......