Wednesday, October 6, 2010

अपेक्षांची फोलता आणि प्रवाहा विरुद्ध पोहता न येण्याची क्षमता
आज कळते माझ्याच ध्येयातील सत्यता आणि स्वप्नांना दिलेली न्याय्यता...
मनाची अधुता आणि वटवृक्षाखाली ही अनुभवलेली रविकिरणांची तीव्रता
क्षितिजापार गेलेल्या मित्राला ह्या सांजवेळी परत आणता येण्याची पात्रता...
नसलेल्या पात्रता, क्षमता, जाणवलेल्या फोलता आणि सत्यता
ह्यापार जाउन हव ते ध्येय खेचायला हवं...
गडबड गोंधळ चिडचिड, स्वतःशीच स्वतःची भांडणं बाजूला सारून
वेडं कुणी म्हणत असेल तरीही हे वेडेपण जपयाला हवंय....


No comments:

Post a Comment