Thursday, August 5, 2010

माझ्या नभातल्या तारकांनो
काय गुन्हा माझा झाला
संपले तेज सारे अन
संपला साथ आपुला....

आठविती मज चांदराती
अवखळसे रूप ते
लखलखाटी हास्य आणि
नयनी भोगलेली आसवे....


साथ आपुला दूर पळवे
शिणवट्याची सारी क्षणे
गुलाबी ह्या स्वप्नामधला
काटा कोणता आता रुते...


सत्य मज़ कुणी दाखवावे
सांगावे अन समज़वावे
सत्य मानु काळोख़ हा का
तारकांची ती अंगणे.....


चांदण्याचे दुःख मला
काळोख़ाचा डर मला
रवितेज जपणारया माझ्या नभाला
तारकांची आता तमा....