Monday, April 12, 2010

नातं

नातं माणसाला बांधून ठेवतात
एक अतूट बंधनात
काहींना ते गुरफ़टलेलं वाटत
तर काहींना ते आधार
नाती वाढवतात माणसाला
मनाला दिलासा देत
बलापणापासून साथ देतात
भरवसा वाढवत
नाती जुळताना जुळतात
अणि तुटताना तुटतात
पण एकदा तुटल्यावर मात्र
ती तुटतच जातात
म्हणून नातं रक्ताचं नसलं
तरी प्रत्येक माणसाशी जोडलं पाहिजे
कारण शेवटी माणुसकीचं नातं
हेच सर्वश्रेष्ट असतं

No comments:

Post a Comment