Sunday, September 12, 2010

हे मान्य आहे की संध्याकाळच्या
ह्या रोमांचक वेळी
आपण दूर आहोत
पण एवढे पुरेसे नाही का
की मावळ्त्या सूर्याची ही कोमल किरणे
आपल्या दोघांनाही न्हाऊ घालत आहेत
हा हळुवार उगवणारा चंद्र त्याच्या चंद्रकिरणांनी
आपल्या दोघांनाही गोंजारतोय
हा मंद वाहणार वारा , हा सुगंध
आपणा दोघांनाही मोहवतोय
आणि ही सामाजिक दरी आपल्याला तितकच दूर करतीए

No comments:

Post a Comment