Friday, August 20, 2010

माझ्या पाखरा माझ्या सख्या
तुझ्याविण न दिन न रात्र माझी
रविभेटीसाठी परिक्रमे ती धरती
पण फाटकी ही झोळी माझी.....

तुझ्यासवे अशी ही जगते रे मी
तुझ्यासंग जग हे पाहते रे मी
कवडश्यातुन आत येणारया त्या किरणातही
तुलाच शोधते रे मी...

पुसत नाही छबी मिटल्या पापण्याही
राही गुंजत शब्द तुझे माझ्या तनमनी
नज़र शोधते तुला ह्या जगात आणि
मन राहतं तुझ्याबरोबर त्या जगात ...

No comments:

Post a Comment