Friday, August 20, 2010

आठवणींनी भरलेल्या माझ्या मनाला
फक्त तुझी साद ऐकू येते
नयनी भरलेल्या आसवांना
फक्त तुझं येणं भुलवतं
आसुसलेल्या माझ्या ओठांना
फक्त तुझाच स्पर्श समज़तो
तू जेव्हा माझा हात हातात धरशील
तेव्हा असंच काहीतरी बोलशील ना?

चांदण्यांनी माखलेल्या अंगणात
झुले उंच उंच जातील
आयुष्याच्या वाळूवर मी लिहिन
अन तू कड़ा बनुन लाटांना थोपवशील
तुझ्या अस्तित्वाचे होणारे भास
सत्यात आता उतरतील
तू जेव्हा मला भेटशील
तेव्हा असंच काहीतरी होईल ना?

का वाटतयं आज तू जवळ असावास
तुझ्या मिठीमध्ये माझा श्वास गुदमरावा
माझ्या केसात फिरणारा तुझा हात
मी पुन्हा पुन्हा चुम्बावा
आणि माझं भालचुम्बन घेऊन तू मला थोपठावं
सुखाची नजर उतरवणारे काजळी थेंब
शिंपल्यात धरायलाही तूच येशील ना ?

No comments:

Post a Comment