Friday, July 30, 2010

सरसरणारया माझ्या पाखरा
चिंब मनातील माझ्या घना
बरसून ये ह्या धरणीवरती
दाखविण्या माझ्या प्रेमा...



प्राजक्ताचा सडा माझ्या अंगणी
सहस्त्रावधि विखुरलेलेया चांदण्या
त्या केशरी देठा जपण्या
हळूच गोंजार ना माझ्या फुला....




तुकतुकणारया त्या दवाबिंदुना
तुझ्या माझ्या भेटी सांग ना
मातीत मिसळुन त्यांना
नव अंकुर फुटू दे ना ......






No comments:

Post a Comment